माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संपादणुकीवर शैक्षणिक आणि सामाजिक घटकांचा प्रभाव : शोध अभ्यास

Main Article Content

ज्योती पांडुरंग इंगळे, प्रा. डॉ. बी. पी. सुभेदार

Abstract

प्रस्तुत संशोधनाचा उद्देश माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संपादणुकीवर परिणाम करणाऱ्या शैक्षणिक आणि सामाजिक घटकांचा अभ्यास करणे हा आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील यशामागे केवळ बौद्धिक क्षमता कारणीभूत नसून शाळेतील अध्यापन, शिक्षकांचे मार्गदर्शन, अभ्याससाहित्य, पालकांचे शैक्षणिक वातावरण, मित्रपरिवार, घरातील आर्थिक व सामाजिक परिस्थिती यांसारखे विविध घटकही महत्त्वाची भूमिका बजावतात. या संशोधनासाठी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एका माध्यमिक शाळेतील 100 विद्यार्थ्यांचा नमुना निवडण्यात आला. संशोधनासाठी सर्वेक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आला असून माहिती संकलनासाठी प्रश्नावली साधनाचा वापर करण्यात आला. संकलित माहितीचे विश्लेषण टक्केवारी पद्धतीने करण्यात आले. संशोधन निष्कर्षांनुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संपादणुकीवर शैक्षणिक आणि सामाजिक घटकांचा लक्षणीय प्रभाव दिसून आला. विशेषतः शैक्षणिक वातावरण, शिक्षकांचे सहकार्य, घरातील अभ्यासासाठी अनुकूल वातावरण, पालकांचे लक्ष आणि सामाजिक पाठबळ हे घटक विद्यार्थ्यांच्या कार्यप्रदर्शनाशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले.

Article Details

How to Cite
ज्योती पांडुरंग इंगळे, प्रा. डॉ. बी. पी. सुभेदार. (2025). माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संपादणुकीवर शैक्षणिक आणि सामाजिक घटकांचा प्रभाव : शोध अभ्यास . International Journal of Advanced Research and Multidisciplinary Trends (IJARMT), 2(1), 1092–1104. Retrieved from https://www.ijarmt.com/index.php/j/article/view/836
Section
Articles

References

करंदीकर सुरेश, (2008), शैक्षणिक मानसशास्त्र, फडके प्रकाशन, कोल्हापूर

घोरमोडे के. यु., (2008), शैक्षणिक संशोधनाची मूलतत्वे, विद्या प्रकाशन, नागपुर

जगताप ह. ना., (2005), शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र, नित्यनूतन प्रकाशन, पुणे

जोशी विनय, (2010), विद्यार्थी विकास आणि ताण, डायमंड पब्लिकेशन, पुणे

दांडेकर वा. ना., (2007), शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र, श्रीविद्या प्रकाशन, पुणे

पंडीत र. वि., (2004), शैक्षणिक मानसशास्त्र, पिंपळापुरे आणि सन्स पब्लिशर्स, नागपूर

पवार. ना. ग., (2009), शिक्षण आणि सामाजीकरण,नूतन प्रकाशन, पुणे

पाटील लीला, (2003), आजचे शिक्षण:आजच्या समस्या, विद्या प्रकाशन, पुणे

पानसे रमेश, (2003), माध्यमिक शिक्षण, ग्राममंगल प्रकाशन, पुणे

बरकले रामदास, पिचड नलिनी, (2010), शैक्षणिक मानसशास्त्र, इनसाइट पब्लिकेशन, नाशिक

शेवतेकर शारदा, (2004), विकासाचे व अध्ययनाचे मानसशास्त्र, विद्या प्रकाशन, नागपूर

सोनवणे संजीव, कागदे शोभा, खैरे गौरी, (2012), प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र विकास व अध्ययन, निराली प्रकाशन, पुणे

Similar Articles

<< < 5 6 7 8 9 10 11 > >> 

You may also start an advanced similarity search for this article.