शिक्षकांना सूक्ष्म अध्ययन कार्यनीतीची अंमलबजावणी करताना येणाऱ्या आव्हानांचा एक चिकित्सक अभ्यास

Main Article Content

सौ. वृंदा महेश पवार, डॉ. अमोल शिवाजी चव्हाण

Abstract

21व्या शतकामध्ये प्रत्येक क्षेत्रात वेगाने बदल घडताना दिसत आहेत. त्यात शिक्षण क्षेत्रातही अमुलाग्र बदल घडत आहे. आपल्या जीवनात तंत्रज्ञानाच्या शिरकाव्यामुळे शैक्षणिक पार्श्वभूमी बदलत आहे.आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांचा एकाग्रतेचा काळ कमी होत चालला आहे.(Nidhi Waldia et al 2013) पारंपारिक आणि दीर्घकालीन चालणाऱ्या अध्ययन अध्यापन पद्धती मधील मर्यादा (MohammedG.S.et al 2018) लक्षात घेता सूक्ष्मअध्ययन कार्यनीती (micro learning strategies) ही एक प्रभावी पद्धती समोर आली आहे. प्रदीर्घ व्याख्यानांपेक्षा त्याच व्याख्यानांचे छोटे घटक (bite sized content ) शिकवणे ही काळाची गरज बनली आहे.(Vivian, J.2018) सूक्ष्म अध्ययन म्हणजे शैक्षणिक माहितीचे अत्यंत छोट्या सुटसुटीत आणि अर्थपूर्ण भागांत (Bite-sized modules) विभाजन करणे.  प्रस्तुत संशोधनाचा मुख्य उद्दिष्ट माध्यमिक स्तरावरील शिक्षकांना ही सूक्ष्मअध्ययन कार्यनीती (micro learning strategies)  प्रत्यक्ष व्यवहारात वापरत असताना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो. याचा चिकित्सक अभ्यास करणे हा आहे.


प्रस्तुत संशोधनासाठी वर्णनात्मक सर्वेक्षण पद्धती(descriptive survey method) वापरण्यात आली आहे. संशोधकाने निवडक माध्यमिक शिक्षकांकडून प्रश्नावली द्वारे माहिती संकलित केली आहे. संशोधनातून असे निष्पन्न झाले की सूक्ष्म अध्ययन पद्धती लवचिक आणि वेळ वाचवणारी असली तरी तिच्या अंमलबजावणीत अनेक अडथळे आहे. यामध्ये प्रामुख्याने इंटरनेटचा अभाव असणे किंवा इंटरनेट असून वेग कमी असणे, अद्ययावत उपकरणांची कमतरता, शिक्षकांमधील तांत्रिक कौशल्याचे अज्ञान, दैनंदिन कामातून मिळणारा कमी वेळ यांचा समावेश होतो. संशोधनातून असे दिसून आले आहे की अनेक शिक्षकांमध्ये डिजिटल साक्षरतेचा अभाव असल्याने ते नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यास मानसिक दृष्ट्या तयार नसतात.


सूक्ष्म अध्ययन कार्यनीती यशस्वी होण्यासाठी शाळांनी पायाभूत सुविधा पुरविणे. शासनाने शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करणे आवश्यक आहे. हे संशोधन शिक्षकांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी आणि विकासासाठी मार्गदर्शक ठरेल. सूक्ष्म अध्ययन राबविताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी उपाय योजना सुचवेल. सदर संशोधनामुळे अध्यापन प्रक्रिया प्रभावी आणि परिणामकारक होण्यास मदत होईल. या दृष्टीने हे संशोधन महत्त्वाचे ठरेल.

Article Details

How to Cite
सौ. वृंदा महेश पवार, डॉ. अमोल शिवाजी चव्हाण. (2026). शिक्षकांना सूक्ष्म अध्ययन कार्यनीतीची अंमलबजावणी करताना येणाऱ्या आव्हानांचा एक चिकित्सक अभ्यास. International Journal of Advanced Research and Multidisciplinary Trends (IJARMT), 3(2), 382–389. https://doi.org/10.65578/ijarmt.v3.i2.932
Section
Articles

References

Hug T. (2005). Microlearning: A New Pedagogical Challenge.

Kapp, K. M., & Defelice, R .A.(2019). Microlearning: Short and Sweet.

Emerson, L.C., & Berge, Z.L92018). Microlearning: Strategies and Best Practices.

Kaware, S. S., & Sain, S.K.92005) ICT as a Change Agent for Education with Reference to Indian Education System.

Das, K. (2021). Microlearning: A New Trend in Digital Pedagogy during COVID-19.

Video-Based microlearning and the impact on programming skills and technology acceptance. Fehaid Lafi Alshammari. Vol 11,No.1,155-165,2024

Mohammed, G.S., Wakil, k.,& Nawroly, S. S. (2018). The effectiveness of microlearning to improve students learning ability. International Journal of Educational Research Review,3(3),32 38. DOI:10.24331/ijere.415824.

Sitzmann, T (2011). A meta-analytic examination of the instructional effectiveness of computer-based simulation games. Personnel psychology,64(2),489-528.10.1111/j.1744-6570.2011.01190.x.

Kohnke, L. (2021). Optimizing microlearning materials for mobile learning. In G. Gabarre, C. Gabarre, & R. Din (Eds.), Microlearning in the digital age: The design and delivery of learning in snippets (pp. 95–109). Routledge. https://doi.org/10.4324/9780367821623-7

Mohammed, G. S., Wakil, K., & Nawroly, S. S. (2018). The effectiveness of microlearning to improve students’ learning ability. International Journal of Educational Research Review, 3(3), 32–39. https://doi.org/10.24331/ijere.415824

Waldia, N., Sonawane, S., Mali, M., & Jadhav, V. (2023). Microlearning strategies for teacher professional development in the era of fourth industrial revolution in India. International Journal of Professional Development, Learners and Learning, 8(2), ep454. https://doi.org/10.30935/ijpdll/13550

Allela, M. A., Ogange, B. O., Junaid, M. I., & Charles, P. B. (2020). Effectiveness of multimodal microlearning for in-service teacher training. Journal of Learning for Development, 7(3), 384-398.

Leong, K., Sung, A., Au, D., & Blanchard, C. (2021). A review of the trend of microlearning. Journal of Work-Applied Management, 13(1), 88-102.

महेश श्रीनिवास बोल्ली,(2015). शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थींना किशोरावस्था शिक्षण देण्यासाठी उद्बोधन कार्यक्रमाची निर्मिती व त्याच्या परिणामकारकतेचा अभ्यास.

Similar Articles

<< < 6 7 8 9 10 11 12 13 14 15 > >> 

You may also start an advanced similarity search for this article.