निर्देशित वाचन-विचार (DRTA) कार्यनीतीचा विद्यार्थ्यांच्या वाचन आकलन व चिकित्सक विचारक्षमतेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास
Main Article Content
Abstract
वाचन ही केवळ लिखित शब्द ओळखण्याची प्रक्रिया नसून अर्थनिर्मिती, अनुमान, विश्लेषण, मूल्यमापन आणि विचार यांचा समन्वय साधणारी बौद्धिक प्रक्रिया आहे. माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांकडून पाठ्यांशाचा आशय समजून घेण्याबरोबरच त्यातील कारण-परिणाम संबंध ओळखणे, अनुमान काढणे, पुराव्यांच्या आधारे निष्कर्ष मांडणे आणि स्वतःच्या विचारांचे पुनर्मूल्यांकन करणे अपेक्षित असते. प्रस्तुत शोध निबंधात Directed Reading-Thinking Activity (DRTA) अर्थात ‘निर्देशित वाचन-विचार कार्यनीती’चा वाचन आकलन आणि चिकित्सक विचारक्षमतेच्या विकासाशी असलेला संबंध अभ्यासण्यात आला आहे. DRTA मध्ये पूर्वज्ञान जागृत करणे, मजकुराविषयी अंदाज व्यक्त करणे, टप्प्याटप्प्याने वाचन करणे, अंदाजांसाठी पाठ्यपुरावे शोधणे आणि आवश्यकतेनुसार पूर्वानुमान बदलणे या प्रक्रियांना महत्त्व दिले जाते. उपलब्ध संशोधनांमध्ये DRTA मुळे विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, अनुमानात्मक आकलन, तर्कशक्ती आणि वाचनातील स्वनियंत्रण वाढण्याची क्षमता दिसून येते. या कार्यनीतीची उद्दिष्टे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील चिकित्सक विचार, क्षमताधारित शिक्षण आणि संकल्पनात्मक आकलनाच्या दिशेशी सुसंगत असल्याचेही स्पष्ट होते.
Article Details

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial 4.0 International License.
References
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ. कुमारभारती : मराठी, इयत्ता नववी. बालभारती, पुणे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ. कुमारभारती : मराठी, इयत्ता दहावी. बालभारती, पुणे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र. जीवन शिक्षण. विविध अंक, SCERT महाराष्ट्र, 2023.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र. वाचन चळवळ विषयक शैक्षणिक साहित्य व प्रकाशने. SCERT महाराष्ट्र.
महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 : शालेय शिक्षणविषयक शासन निर्णय व मार्गदर्शक सूचना. महाराष्ट्र शासन.
Stauffer, Russell G. Directing Reading Maturity as a Cognitive Process. Harper & Row, 1969.
Haggard, Martha R. “Developing Critical Thinking with the Directed Reading-Thinking Activity.” The Reading Teacher, vol. 41, no. 6, 1988, pp. 526–533.
Tierney, Robert J., John E. Readence, and Ernest K. Dishner. Reading Strategies and Practices: A Compendium. Allyn & Bacon, 1995.
Oakhill, Jane, Kate Cain, and Carsten Elbro. Understanding and Teaching Reading Comprehension: A Handbook. Routledge, 2014.
Chaemsai, Ratchadaporn, and Saowalak Rattanavich. “The Directed Reading-Thinking Activity (DR-TA) and the Traditional Approach Using Tales of Virtue.” English Language Teaching, vol. 9, no. 9, 2016, pp. 18–27.
Almanza, Teresa. The Effects of the DRTA and Cooperative Learning Strategies on Reading Comprehension. ERIC, 1997.
Nerim. “Scrutinizing Directed Reading Thinking Activity (DRTA) Strategy on Students’ Reading Comprehension.” Journal of Languages and Language Teaching, vol. 8, no. 2, 2020, pp. 128–138.
Renn, Catherine E. The Effects of the Directed Reading Thinking Activity on Second Grade Reading Comprehension. Grand Valley State University, 1999.
Government of India, Ministry of Education. National Education Policy 2020. Ministry of Education, 2020.
National Council of Educational Research and Training. National Curriculum Framework for School Education 2023. NCERT, 2023.