ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताच्या दहशतवादविरोधी धोरणात झालेले परिवर्तन - सामरिक परिणामांचा चिकित्सक अभ्यास

Main Article Content

प्रा. राहुल दिलीप पाटील

Abstract

दहशतवाद हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसमोरील दीर्घकालीन आव्हान असून, सीमापार दहशतवादामुळे भारत-पाकिस्तान संबंध आणि दक्षिण आशियातील सामरिक स्थैर्य सातत्याने प्रभावित झाले आहे. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 7 मे 2025 रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले. या कारवाईनंतर भारताच्या दहशतवादविरोधी धोरणातील प्रतिबंध, प्रत्युत्तर, सामरिक प्रतिरोध आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या स्वरूपासंबंधी महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले.


प्रस्तुत संशोधन लेखात ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारताच्या दहशतवादविरोधी धोरणातील सातत्य आणि परिवर्तन यांचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. विशेषतः मर्यादित लष्करी प्रत्युत्तराची संकल्पना, अण्वस्त्रांच्या पार्श्वभूमीवरील संघर्षनियंत्रण, बहुआयामी सुरक्षाव्यवस्था, संरक्षण तंत्रज्ञान, राजनैतिक दबाव आणि प्रादेशिक स्थैर्य यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. या अभ्यासासाठी ऐतिहासिक, वर्णनात्मक आणि तुलनात्मक संशोधनपद्धतीचा अवलंब करण्यात आला असून, भारत सरकारची अधिकृत निवेदने, संरक्षणविषयक अहवाल आणि स्वतंत्र सामरिक अभ्याससंस्थांच्या विश्लेषणांचा आधार घेतला आहे. उपलब्ध पुराव्यांवरून असे दिसून येते की, ऑपरेशन सिंदूरनंतर भारत सरकारने दहशतवादी हल्ल्यांना मर्यादित परंतु प्रत्यक्ष लष्करी प्रत्युत्तर देण्याच्या धोरणाला अधिक स्पष्ट राजकीय स्वरूप दिले. त्याचवेळी मे 2025 मधील संघर्षाने लष्करी प्रत्युत्तराचे संभाव्य परिणाम, गैरसमजांमधून निर्माण होणारा संघर्षविस्तार आणि दहशतवादविरोधी कारवाईच्या दीर्घकालीन परिणामकारकतेविषयी प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे या धोरणातील परिवर्तन समजून घेताना लष्करी क्षमता, राजनैतिक व्यवस्थापन आणि प्रादेशिक सुरक्षेचा एकत्रित विचार आवश्यक ठरतो.

Article Details

How to Cite
प्रा. राहुल दिलीप पाटील. (2026). ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताच्या दहशतवादविरोधी धोरणात झालेले परिवर्तन - सामरिक परिणामांचा चिकित्सक अभ्यास. International Journal of Advanced Research and Multidisciplinary Trends (IJARMT), 3(3), 1013–1018. Retrieved from https://www.ijarmt.com/index.php/j/article/view/1297
Section
Articles

References

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, संरक्षणशास्त्र, इयत्ता बारावी, पुणे, 2020, भारताची सुरक्षा : संकल्पनात्मक चौकट, पृ. क्र. 1.

तत्रैव, भारताचे शेजारी : पाकिस्तान आणि चीन, पृ. क्र. 15.

तत्रैव, भारत आणि आशिया, पृ. क्र. 25.

तत्रैव, भारताची आण्विक, अवकाश आणि सागरी धोरणे, पृ. क्र. 40.

तत्रैव, अंतर्गत सुरक्षा, पृ. क्र. 51.

तत्रैव, भारताचे स्वातंत्र्योत्तर सशस्त्र संघर्ष, पृ. क्र.66.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, संरक्षणशास्त्र, इयत्ता दहावी, पुणे, राष्ट्रीय सुरक्षा संकल्पनेचे बदलते स्वरूप, पृ. क्र. 1.

तत्रैव, अंतर्गत सुरक्षा, पृ. क्र.6.

तत्रैव, आपत्ती व्यवस्थापनातील लष्कराचे कार्य, पृ. क्र.24.

तत्रैव, विज्ञान, तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षा, पृ. क्र.30.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, संरक्षणशास्त्र, इयत्ता नववी, पुणे, 2017, राष्ट्रीय सुरक्षा, पृ. क्र.1.

तत्रैव, राष्ट्रीय सुरक्षा आव्हाने : बाह्य, पृ. क्र.7.

तत्रैव, भारतीय संरक्षण व्यवस्था, पृ. क्र.13.

तत्रैव, भारतीय नौसेना, पृ. क्र.26.

तत्रैव, संरक्षणाच्या दुय्यम संघटना, पृ. क्र.42.

Similar Articles

<< < 1 2 3 4 5 6 7 8 9 > >> 

You may also start an advanced similarity search for this article.